Paytm hits 20 percent lower circuit as firm decides to cut down on small-ticket loans  Sakal
Share Market

Paytm Share: एक निर्णय अन् पेटीएमच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण, गुंतवणूकदार चिंतेत

Paytm Share: भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाशी संबंधित नियम कडक केले आहेत.

राहुल शेळके

Paytm Share: छोटी पोस्टपेड कर्जे कमी करण्याच्या योजनेमुळे पेटीएमच्या शेअर्सला मोठा धक्का बसला आहे. आज 7 डिसेंबर रोजी सुरुवातीच्या व्यापारातच पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण झाली.

कंपनीने लहान आकाराची पोस्टपेड कर्जे कमी करण्याची आणि मोठ्या आकाराची वैयक्तिक कर्जे आणि व्यापारी कर्जे वाढवण्याची योजना जाहीर केली. ब्रोकरेजला कंपनीचा हा निर्णय आवडला नाही, त्यांनी कंपनीचे रेटींग कमी केले आहे.

आज सकाळी पेटीएमचे शेअर्स बीएसईवर 744.95 रुपये आणि एनएसईवर 728.85 रुपयांच्या घसरणीसह उघडले. उघडल्यावर त्यात 20 टक्क्यांची घसरण झाली आणि बीएसई आणि एनएसई दोन्ही निर्देशांकांवर पेटीएमचे शेअर्स अनुक्रमे 650.65 रुपये आणि 650.45 रुपयांवर पोहोचले.

अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम कडक केले आहेत. RBI ने लहान कर्जाचे जोखीम वेटेज 25 टक्क्यांनी वाढवले ​​आहे आणि ते 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर वैयक्तिक कर्ज महाग होणार असून पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित वैयक्तिक कर्जाची संख्या कमी करणे भाग पडले आहे.

मॉर्गन स्टॅनलीचा विश्वास आहे की लहान पोस्टपेड कर्जाचा आकार कमी करण्याच्या निर्णयामुळे नजीकच्या काळात पेटीएमच्या कर्ज वितरणामध्ये घसरण होईल. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा असा विश्वास आहे की पेटीएम प्रत्येक तिमाहीत सरासरी 3.5-4 लाख ग्राहक जोडते. त्यात 50 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. ब्रोकरेजने Paytmचा FY24/FY25 वितरण अंदाज 15-18 टक्क्यांनी कमी केला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT