Share Market  Sakal
Share Market

Share Market : आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

सोमवारी बाजार गेल्या आठवड्यातील दबावातून सावरत वाढीसह बंद झाले. काही खासगी बँकांच्या जोरदार निकालांनी बाजारातील मूड सुधारला.

शिल्पा गुजर

Share Market : सोमवारी बाजार गेल्या आठवड्यातील दबावातून सावरत वाढीसह बंद झाले. काही खासगी बँकांच्या जोरदार निकालांनी बाजारातील मूड सुधारला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 0.67 टक्के म्हणजेच 410.04 अंकांच्या वाढीसह 60056.10 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 119.35 म्हणजेच 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 17743.40 च्या पातळीवर बंद झाला. (pre analysis of share market update 25 April 2023 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी सोमवारी सपाट नोटवर उघडला आणि ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या सहामाहीत मजबूत होत गेल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. पण ट्रेडिंग सत्राच्या दुसऱ्या सत्रात बाजाराने वेग पकडला आणि निफ्टी 17700 च्या वर बंदहोरण्यात यशस्वी झाला.याचा अर्थ निफ्टीमध्ये अपट्रेंडचा पुढील टप्पा सुरू झाल्याचे समजते आहे.

डेली चार्टवर, निफ्टीने रायझिंग चॅनेलचे खालचे टोक आणि 200-दिवसांची मूव्हिंग एव्हरेज (1,615) राखण्यात यश मिळवले आहे, जो एक तेजीचा सिग्नल आहे. पण, डेली मोमेंटम इंडिकेटरमध्ये नकारात्मक क्रॉसओव्हर आहे.

किमतीमध्ये पुन्हा अपट्रें सुरू झाल्यामुळे, पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये मोमेंटम इंडिकेटर सकारात्मक क्रॉसओव्हर देईल अशी शक्यता आहे. निफ्टीचा शॉर्ट टर्म आऊटलूक सकारात्मक आहे आणि लवकरच निफ्टी 18100 ला स्पर्श करताना दिसेल. निफ्टीला 17620 - 17600 वर सपोर्ट दिसत आहे. तर, 17860 - 17900 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • विप्रो (WIPRO)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • पीएनबी (PNB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Protest : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी शिक्षकांचा ‘आक्रोश मोर्चा’; २८२ शाळांतील १,१५० शिक्षक सामूहिक रजेवर!

Pune Crime : नीलेश घायवळचा नंबरकारी अजय सरवदेकडून पिस्तुलासह चारशे काडतुसे जप्त!

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

SCROLL FOR NEXT