Share Market Today Sakal
Share Market

Share Market : आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

गेल्या काही आठवड्यांपासून बाँड यील्डमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे इथून पुढे व्याजदर वाढणार नाहीत असा गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

शिल्पा गुजर

सोमवारी बाजारात तेजी दिसून आली. कारण खरेदीदारांनी शेअर्स जमा करण्यास सुरुवात केली. विशेषत: रियल्टी, बँकिंग आणि ऑटोसारख्या सेक्टर्समधून अनेक स्टॉक्स खरेदी करण्यात आले. यूएसमध्ये आणखी एक दर वाढण्याची शक्यता कमी आहे. आणि गेल्या काही आठवड्यांपासून बाँड यील्डमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे इथून पुढे व्याजदर वाढणार नाहीत असा गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

त्यामुळेच निफ्टी इंडेक्स 195.40 अंकांनी अर्थात 1.08 टक्क्यांनी वाढून 18,264.40 वर पोहोचला. तर बीएसई सेन्सेक्स 709.96 अंकांनी म्हणजेच 1.16 टक्क्यांनी वाढून 61,764.25 वर पोहोचला. (pre analysis of share market update 9 may 2023 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गेल्या शुक्रवारच्या करेक्शननंतर, बेंचमार्क निफ्टीने पुन्हा एकदा 18050 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि जोरदार कमबॅक केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यानंतर इंडेक्सने 18200 चा शॉर्ट टर्म रझिस्टन्स पार केला जो पॉझिटीव्ह राहिला.

इंडेक्सने डेली चार्टवर तेजीची मेणबत्ती तयार केली आहे. सध्या ते 18200 च्या वर ट्रेडिंग करत आहे. याच्या वर गेल्यास इंडेक्स 18350-18400 पर्यंत वाढू शकतो. दुसरीकडे, 18200 च्या खाली गेल्यास अपट्रेंड कमकुवत होईल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • ओएनजीसी (ONGC)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT