Budget Modi Sakal
Share Market

Modi Stocks: मोदी स्टॉक बजेटमध्ये जादू दाखवतील का? एका महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल, तज्ज्ञ काय सांगतात

Stocks To Buy Before Budget: गेल्या एका महिन्यात रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 77 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. किंबहुना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचा अजेंडा सुरू ठेवतील अशी शेअर बाजाराची अपेक्षा आहे.

राहुल शेळके

Budget 2024: गेल्या एका महिन्यात रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 77 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. किंबहुना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचा अजेंडा सुरू ठेवतील अशी शेअर बाजाराची अपेक्षा आहे.

तसेच, आर्थिक आघाडीवर, ज्या प्रकारचे धोरण सरकार गेली 10 वर्षे राबवत आहे, ते कायम राहील. अशा स्थितीत अर्थसंकल्पाकडून या दोन्ही क्षेत्रांच्या अपेक्षा आहेत.

विशेष बाब म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात आलेल्या या तेजीमुळे पीएसयूचे बहुतांश शेअर्स त्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. किंबहुना या शेअर्सना मोदी स्टॉक्स असेही म्हणतात. Goldman Sachs च्या अंदाजानुसार, जर RBI कडून मिळालेला हेवीवेट लाभांश खर्च वाढवण्यासाठी वापरला गेला तर भांडवली खर्चाची वाढ दरवर्षी 21 टक्क्यांनी वाढू शकते.

कोणत्या शेअर्समध्ये वाढ झाली?

गेल्या महिन्यात, Mazagon डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये 77 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्यानंतर मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक RVNL 51 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे कोचीन शिपयार्ड, HUDCO, RCF, NBCC, BEML आणि IRCON च्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात किमान 30 टक्के परतावा दिला आहे.

रेल्वेचे भांडवल वाढेल

Pace 360चे अमित गोयल यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील पाच वर्षांत रेल्वे क्षेत्रातील कॅपेक्स 76 टक्क्यांनी वाढून 2.55 लाख कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे. योजनांमध्ये कोळसा आणि खनिज वाहतूक, बंदर कनेक्टिव्हिटी सुधारणे इत्यादींना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेषत: रस्ते, महामार्ग आणि बोगदे यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की 2021 ते 2026 पर्यंत कॅपेक्समध्ये अंदाजे 11.4 टक्के वाढ वाहतूक नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असू शकते.

अर्थसंकल्पात कमी उत्पन्न श्रेणी आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. ट्रस्ट म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर व्होरा म्हणाले की, बाजाराचे लक्ष पायाभूत सुविधा, उत्पादन, संरक्षण, रेल्वे, वीज इत्यादींसाठी अर्थसंकल्पीय वाटपावर असू शकते. शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पानंतरही शेअर बाजारात वाढ होऊ शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT