IPO Open sakal
Share Market

IPO Open : पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ आजपासून सुरु ; ग्रे मार्केटमध्ये दमदार घोडदौड..

कॉर्पोरेट स्टॉक ब्रोकिंग हाऊस पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ आजपासून सुरु झाला आहे. या आयपीओमधून कंपनीचा 38.23 कोटी उभे करण्याचा मानस आहे. ही कंपनी 2007 मध्ये सुरू झाली. लेटेस्ट टेक्नोलॉजी, मार्केट रिसर्च आणि अत्याधुनिक ऍनालिटिकल सिस्टम्सचा वापर करुन ही कंपनी ग्राहकांना त्यांची गुंतवणूकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करते.

सकाळ वृत्तसेवा

कॉर्पोरेट स्टॉक ब्रोकिंग हाऊस पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ आजपासून सुरु झाला आहे. या आयपीओमधून कंपनीचा 38.23 कोटी उभे करण्याचा मानस आहे. ही कंपनी 2007 मध्ये सुरू झाली. लेटेस्ट टेक्नोलॉजी, मार्केट रिसर्च आणि अत्याधुनिक ऍनालिटिकल सिस्टम्सचा वापर करुन ही कंपनी ग्राहकांना त्यांची गुंतवणूकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करते. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी 12 मार्चपर्यंत वेळ असेल. या आयपीओमध्ये 46.06 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. तर या आयपीओसाठीचा प्राइस बँड प्रति शेअर 78-83 रुपये ठेवण्यात आला आहे.

आयपीओच्या बोलीसाठी लॉट साइज 1600 शेअर्स आहे. आयपीओ 12 मार्चला बंद झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सची लिस्टींग बीएसई एसएमईवर 15 मार्चला होईल. शेयर इंडिया कॅपिटल सर्विसेज प्रायवेट लिमिटेड हे पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूसाठी रजिस्ट्रार आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज ही मार्केट मेकर आहे.

आयपीओमधील 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. ग्रे मार्केट प्रीमियमबद्दल बोलायचे झाले तर, आयपीओ सुरू होण्यापूर्वीच, शेअर ग्रे मार्केटमधील अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत 83 रुपये अर्थात 100 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. ग्रे मार्केट हा एक अनधिकृत बाजार आहे जिथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट होईपर्यंत व्यापार करतात.

एप्रिल-सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीचा महसूल 30.10 कोटी होता. तर निव्वळ नफा 6.10 कोटी होता. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचे प्रमोटर वृजेश कृष्णकुमार शाह, देवेंद्र रामचंद्र घोडनाडीकर, वृजेश नवनीतभाई शाह, संदीप सुंदरलाल शहा, परेश सुंदरलाल शाह आणि दैदीप्या घोडनाडीकर आहेत. सध्या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 72.75 टक्के आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 51.34 टक्के कमी होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

E-Scooter : 107 रुपयांत पूर्ण महिना चालेल 'ही' स्कूटर; एप्रिल महिन्यात 17,960 लोकांनी केली खरेदी, एकदा बघाच कमी किंमतीत जबरदस्त गाडी

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

SCROLL FOR NEXT