Rahul Gandhi Portfolio Sakal
Share Market

Narendra Modi: नरेंद्र मोदींच्या विजयाने राहुल गांधी झाले मालामाल; 3 दिवसांत केली लाखो रुपयांची कमाई

Rahul Gandhi Portfolio: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारात मोठी वाढ होत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही पीएम मोदींच्या विजयाचा मोठा फायदा होत आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओमध्येही वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Rahul Gandhi Portfolio: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारात मोठी वाढ होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही पीएम मोदींच्या विजयाचा मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओमध्येही वाढ झाली आहे. राहुल गांधींच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये सुमारे 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राहुल गांधींकडे 'या' कंपन्यांचे शेअर्स

राहुल गांधी यांच्याकडे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत. यामध्ये इन्फोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडीलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावरून ही माहिती मिळाली आहे.

निवडणुकीच्या निकालापूर्वी सोमवारी बाजारातील वाढीमुळे राहुल गांधींच्या खात्यात सुमारे 3.45 लाख रुपयांची वाढ झाली. मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशीही त्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अंदाजे 4.08 लाख रुपयांची घट झाली होती.

बुधवारपासून त्यांचा पोर्टफोलिओ सातत्याने वाढत आहे

यानंतर बुधवारपासून शेअर बाजारात तेजी सुरू झाली. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, 5 जून रोजी राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 13.9 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 6 जून रोजी त्यात सुमारे 1.78 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 31 मे पासून राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये 3.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना सुमारे 15 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

बुधवारपासून त्यांचा पोर्टफोलिओ सातत्याने वाढत आहे

यानंतर बुधवारपासून शेअर बाजारात तेजी सुरू झाली. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, 5 जून रोजी राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 13.9 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 6 जून रोजी त्यात सुमारे 1.78 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 31 मे पासून राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये 3.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना सुमारे 15 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

हा आठवडा शेअर बाजारात प्रचंड चढ-उतारांनी भरलेला होता

4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी सत्ताधारी पक्ष भाजपला बहुमत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पण, पुढच्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात मोठी रिकव्हरी झाली आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT