Isha Ambani Sakal
Share Market

Isha Ambani: मुकेश अंबानींच्या मुलीची खेळण्यांच्या व्यवसायात एंट्री; 'या' कंपनीसोबत केला करार

रिलायन्स रिटेलची प्रमुख ईशा अंबानी आता खेळणी बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे.

राहुल शेळके

Isha Ambani: भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची प्रमुख ईशा अंबानी आता खेळणी बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे.

रिलायन्स रिटेलने रविवारी जाहीर केले की त्यांनी हरियाणास्थित कंपनीसोबत संयुक्त उपक्रम (Joint venture) स्थापन करून खेळण्यांच्या स्थानिक उत्पादनाच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील घरगुती खेळण्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स रिटेलकडे सध्या यूकेच्या खेळण्यांचा ब्रँड हॅम्लेज आणि घरगुती खेळण्यांचा ब्रँड रोवन आहेत. रिलायन्स रिटेलने सोनपतची कंपनी ई-सर्कील रिटेलसोबत संयुक्त उपक्रम करून खेळण्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स रिटेलचे सीएफओ दिनेश सलुजा म्हणाले, "आम्ही सर्कल ई-रिटेलसह संयुक्त उपक्रमात प्रवेश केला आहे आणि आम्ही खेळण्यांचे उत्पादन आणि रिटेलिंग व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करण्यासाठी काम करत आहोत."

रिलायन्स रिटेल कंपनी डिझाइनपासून सेल्फ डिलिव्हरीपर्यंत सर्व प्रक्रिया एकत्रित करण्याच्या धोरणावर काम करत आहे.

रिलायन्स रिटेल डिझाईन करण्यापासून ते खेळण्यांचे उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत सर्व व्यवसाय स्वतः करत आहे. यामुळे रिलायन्सला थर्ड पार्टी उत्पादक अवलंबित्व कमी करण्यात मदत होईल.

रिलायन्स रिटेल टॉईजच्या विद्यमान दोन ब्रँड्स, हॅमलेज आणि रोवनची जबाबदारीही नवीन संयुक्त उपक्रमावर टाकण्यात आली आहे. रिलायन्स रिटेल ही B2B (Business-to-Business service) विभागातील एक मोठी कंपनी आहे जिथे ती रोवन ब्रँडद्वारे व्यवसाय करते.

सर्कल ई रिटेल कंपनी खेळण्यांच्या निर्मितीमध्ये स्पेशलायझेशन आहे. हरियाणामध्ये त्याची आधुनिक उत्पादन सुविधा आहे आणि खेळण्यांचे उत्पादन आणि वितरण करण्यास कंपनी सक्षम आहे.

रिलायन्स रिटेलच्या या वाटचालीचा उद्देश ब्रँडेड खेळण्यांच्या बाजारपेठेत मोठा वाटा मिळवणे आणि लहान दुकानांपर्यंतही पोहोचणे हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT