Stock Spli esakal
Share Market

Stock Split : 3 वर्षात 510 टक्के वाढ, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा

स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल

सकाळ डिजिटल टीम

Salasar Exteriors and Contour Ltd Stock Split : सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड (Salasar Exteriors and Contour Ltd) या बांधकाम क्षेत्रातील कंपनीने त्यांचे स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने नुकतीच एका बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली. हे स्टॉक स्प्लिट 1:10 च्या प्रमाणात केले जाईल. म्हणजेच कंपनीचा 1 शेअर 10 छोट्या शेअर्समध्ये विभागला जाईल. विभाजनानंतर, प्रत्येक शेअरहोल्डरला 1 शेअरसाठी 10 शेअर्स मिळतील. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल असेही कंपनीने सांगितले.

सालासर एक्सटेरियर्स हा एनएसईवर लिस्ट असलेला एक स्मॉलकॅप स्टॉक आहे ज्याचे मार्केट कॅपिटल सुमारे 231.3 कोटी रुपये आहे. सध्या त्याचे शेअर्स 224.65 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. हा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 51 टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे.

सालासार एक्सटेरियर्सची गणना मल्टीबॅगर शेअर्समध्ये केली जाते. या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागच्या वर्षात दमदार परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर्स जवळपास 116 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 510% परतावा दिला आहे.

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन. सहसा जेव्हा शेअर्सची किंमत जास्त असते तेव्हा कंपनी लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपले शेअर्स विभाजित करते. यामुळे शेअर्सची किंमत कमी होते आणि कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या वाढते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT