Samhi Hotels IPO Sakal
Share Market

Samhi Hotels IPO: पैसे तयार ठेवा! साम्ही हॉटेलचा IPO 14 सप्टेंबरला होणार खुला, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

Samhi Hotels IPO: इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील.

राहुल शेळके

Samhi Hotels IPO: साम्ही होटल्स लिमिटेडचा (SAMHI Hotels Ltd) आयपीओ 14 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणा आहे. हा आयपीओ 1,350 कोटींचा आहे. कंपनीने आयपीओसाठी 119-126 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममधील कंपनी साम्ही हॉटेल्सच्या आयपीओतून 1,200 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आणि 170 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत ऑफर केले जातील.

या आयपीओमध्ये गुंतवणूकदार किमान 119 इक्विटी शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी या इश्यूचे बुक रनिंग मॅनेजर आहेत, तर केफिन टेक्नॉलॉजीज हे रजिस्ट्रार आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील.

31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात साम्ही हॉटेल्सचा नेट लॉस 338.59 कोटी होता. महसूल 761.43 कोटी होता. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नेट लॉस 443.25 कोटी होता, तर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 333.10 कोटी होता.

31 मार्च 2023 पर्यंत कंपनी देशातील 14 शहरांमध्ये 31 हॉटेल्स चालवत आहे. कंपनीच्या हॉटेल्समध्ये बेंगळुरू, हैदराबाद, नॅशनल कॅपिटल रिजन (NCR), पुणे, चेन्नई, अहमदाबाद यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीची कोलकाता आणि नवी मुंबई इथे एकूण 461 खोल्या असलेली 2 हॉटेल्स अंडर कंस्ट्रक्शन आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT