Share Market SBFC Finance Sakal
Share Market

SBFC Finance: फायनान्स कंपनीची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 25 रुपयांचा नफा

SBFC Finance Listing: एनएसई आणि बीएसईवर एसबीएफसी फायनान्सच्या शेअर्सची धमाकेदार लिस्टिंग झाली आहे.

राहुल शेळके

SBFC Finance Listing: एनएसई आणि बीएसईवर एसबीएफसी फायनान्सच्या शेअर्सची धमाकेदार लिस्टिंग झाली आहे. NSE वर 82 रुपये प्रति शेअर या दराने सूचीबद्ध आहेत. एनएसई आणि बीएसईवर एसबीएफसी फायनान्स शेअर्सची लिस्टिंग सुमारे 44 टक्के प्रीमियमसह केली गेली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना या IPO मध्ये वाटप केलेल्या प्रत्येक शेअरवर सुमारे 44 टक्के इतका चांगला नफा मिळाला आहे.

SBFC फायनान्सचे किती रुपयांचे शेअर्स BSE वर सूचीबद्ध आहेत?

बीएसईवर एसबीएफसी फायनान्सच्या शेअर्सची लिस्टिंग 81.99 रुपयांवर झाली आहे आणि यामध्येही गुंतवणूकदारांना 43.8 टक्के प्रीमियमवर लिस्टिंग पाहायला मिळाली आहे.

प्रत्येक शेअरवर 25 रुपये नफा

SBFC फायनान्स शेअर्सची IPO मध्ये वरच्या बँडमध्ये 57 रुपये किंमत होती आणि आज शेअर्स 82 रुपये (NSE) वर लिस्ट झाले आहेत. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 25 रुपये नफा मिळाला आहे.

SBFC फायनान्सच्या IPO ला कसा प्रतिसाद मिळाला?

नॉन-बँकिंग फायनान्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली होती आणि इश्यू 70 पेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला होता.

एसबीएफसी फायनान्सच्या आयपीओमध्ये, गुंतवणूकदारांनी 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान सदस्यत्व घेतले होते. कंपनीने प्रति शेअर 54 ते 57 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला होता.

विशेष म्हणजे, एसबीएफसी फायनान्सच्या शेअर्सच्या सूचीपूर्वी, ग्रे मार्केटमध्ये त्याचे शेअर्स 26 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते.

एसबीएफ फायनान्स कंपनी काय करते?

एसबीएफ फायनान्स कंपनी मुख्यत्वे लघु उद्योगांना म्हणजेच एमएसएमईला कर्ज देण्याचे काम करते. याशिवाय पगारदार आणि नोकरदार लोकांनाही कर्ज देते.

SBFC फायनान्स लिमिटेड ची स्थापना सन 2008 मध्ये झाली आणि ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे.

जी प्रामुख्याने उद्योजक, छोटे व्यवसाय मालक, स्वयंरोजगार तसेच पगारदार आणि कामगार वर्गातील व्यक्तींना कर्ज देते. कंपनी हे कर्ज सोन्याच्या मोबदल्यात देते.

SBFC फायनान्सचे देशातील 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 105 शहरांमध्ये 157 पेक्षा जास्त शाखांचे विस्तृत नेटवर्क आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT