Seagull India's IPO Sakal
Share Market

Seagull India's IPO : 1 ऑगस्टला खुला होणार सीगल इंडियाचा आयपीओ, तुम्ही तयार आहात का ?

Seagull India's IPO latest news | इंफ्रास्ट्रक्चर कंस्ट्रक्शन कंपनी सीगल इंडियाचा (Ceigall India) आयपीओ 1 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंफ्रास्ट्रक्चर कंस्ट्रक्शन कंपनी सीगल इंडियाचा (Ceigall India) आयपीओ 1 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडणार आहे. अँकर गुंतवणूकदार 31 जुलैला यात बोली लावू शकतील. 5 ऑगस्टला आयपीओ बंद झाल्यानंतर, 6 ऑगस्टला शेअर्सचे ऍलॉटमेंट होऊ शकते.

तर 8 ऑगस्ला लिस्टींग होणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आयआयएफएल सिक्युरिटीज यांना मर्चंट बँकर नियुक्त करण्यात आले आहेत. लिंक इनटाइम इंडिया या ऑफरसाठी रजिस्ट्रार आहे. 29 जुलैला या आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित केला जाईल.

सीगल इंडिया आपल्या आयपीओमध्ये 684.3 कोटीचे नवीन शेअर जारी करणार आहे. प्रमोटर्ससह विद्यमान शेअरहोल्डर्सकडून 1 कोटी 41 लाख 74 हजार 840 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलदेखील असेल.

प्रमोटर रामनीक सेहगल, रामनीक सेहगल अँड सन्स एचयूएफ, अवनीत लुथरा, मोहिंदर पाल सिंग सेहगल, परमजीत सहगल आणि सिमरन सहगल हे शेअर्स ओएफएसअंतर्गत विक्रीसाठी ठेवतील. सहगल कुटुंबाची कंपनीत 99.99 टक्के हिस्सेदारी आहे. सीगल इंडियाचे एकमेव पब्लिक शेअरहोल्डर कंवलदीप सिंग लुथरा आहेत. लुथरा यांच्याकडे 16,000 शेअर्स किंवा 0.01 टक्के पेड अप इक्विटी आहे.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2 कोटींपर्यंतचे शेअर्स राखून ठेवले आहेत. यानंतर, उर्वरित नेट इश्यूपैकी 50 टक्के पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

सीगल इंडियाकडे 9,470.8 कोटीची ऑर्डर बुक आहे, त्यापैकी 80.3 टक्के प्रोजेक्ट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) आहेत. कंपनीने रस्ते आणि महामार्ग क्षेत्रातील 16 ईपीसीसह 34 हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.सध्या, त्याच्याकडे 18 चालू प्रोजेक्ट आहेत, ज्यात 13 EPC प्रोजेक्ट आणि 5 HAM प्रोजेक्ट आहेत

नवीन शेअर्स जारी करून मिळालेल्या पैशांपैकी, कंपनी उपकरणे खरेदी करण्यासाठी 99.8 कोटी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी 413.4 कोटी खर्च करेल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च केली जाईल.

सीगल इंडियाकडे 1,883.4 कोटीचे कर्ज थकीत आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा नफा 83 टक्क्यांनी वाढून 306.1 कोटी झाला आहे. याच कालावधीत महसूल 46.5 टक्क्यांनी वाढून 3,029.4 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये EBITDA 75.1 टक्क्यांनी वाढून 517.7 कोटी झाला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT