SEBI Survey Sakal
Share Market

SEBI Survey: शेअर बाजारात सर्वात जास्त पैसे कोण कमावतो? जाणून घ्या सेबीच्या सर्वेक्षणात नेमकं काय?

SEBI Survey; "Who makes the most money": शेअर बाजारातून नफा मिळविण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत का? सेबीच्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. या मागचे कारण कर आकारणीशी संबंधित आहे.

राहुल शेळके

SEBI Survey: शेअर बाजारातून नफा मिळविण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत का? सेबीच्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. या मागचे कारण कर आकारणीशी संबंधित आहे. सेबीच्या सर्वेक्षणानुसार, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये महिलांचे नुकसानीचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे.

पुरुष महिलांचे डीमॅट खाते वापरतात

बाजारातील तज्ज्ञांनी मनीकंट्रोलला सांगितले की, अनेक पुरुष कर वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी किंवा आईच्या नावाने उघडलेले डिमॅट खाते वापरतात. त्यामुळे शेअर बाजारात नफा कमावण्याचे कौशल्ये पुरुषांचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न बरेच जास्त असू शकते कारण त्यात व्यापार उत्पन्नासह त्याच्या पगाराच्या उत्पन्नाचा समावेश असू शकतो.

महिला व्यापाऱ्यांना नुकसान होण्याचे प्रमाण कमी

पत्नी किंवा आईच्या नावाने उघडलेले डिमॅट खाते वापरल्याने एकूण करपात्र उत्पन्न कमी होते. SEBIच्या अभ्यासानुसार, FY19 पासून, महिलांचे तोट्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी झाले आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये महिलांचे नुकसान होण्याचे प्रमाण 66 टक्के होते, तर पुरुषांचे नुकसान होण्याचे प्रमाण 72 टक्के होते. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2023 मध्ये महिलांचे नफा कमावण्याचे प्रमाण 23 टक्के होते, जे पुरुषांच्या नफा कमावण्याच्या तुलनेत 28 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

या अभ्यासातून असेही दिसून आले की लग्न झालेली व्यक्ती जास्त नफा कमावते. विवाहित व्यक्तींचे केवळ तोट्याचे प्रमाण कमी नाही तर नफ्याचे प्रमाणही जास्त आहे. याचे मुख्य कारण लग्न नसून वय आणि बुद्धिमत्ता आहे, असे बाजाराती तज्ज्ञ सांगतात.

सॅमको सिक्युरिटीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक नीलेश शर्मा म्हणाले की, साधारणपणे लोक वयाच्या 30 व्या वर्षी लग्न करतात. या वयात माणसाला खूप अनुभव असतो. यामुळे त्यांना तोटा कमी आणि नफा जास्त होतो. तरुण व्यापाऱ्यांच्या बाबतीतही असेच आहे, ज्यांचे नुकसानीचे प्रमाण अनुभवी व्यापाऱ्यांपेक्षा कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT