Sensex and Nifty esakal
Share Market

Sensex And Nifty : आठ दिवसांची पडझड थांबली निर्देशांक पाउण टक्का वाढले

जागतिक शेअर बाजारातील तेजीचा आधार घेऊन आज सेन्सेक्स व निफ्टी हे भारतीय शेअर बाजार निर्देशांक पाउण ते एक टक्क्यांच्या आसपास वाढले.

सकाळ वृत्तसेवा

जागतिक शेअर बाजारातील तेजीचा आधार घेऊन आज सेन्सेक्स व निफ्टी हे भारतीय शेअर बाजार निर्देशांक पाउण ते एक टक्क्यांच्या आसपास वाढले.

मुंबई - जागतिक शेअर बाजारातील तेजीचा आधार घेऊन आज सेन्सेक्स व निफ्टी हे भारतीय शेअर बाजार निर्देशांक पाउण ते एक टक्क्यांच्या आसपास वाढले. ४४८.९६ अंश वाढलेला सेन्सेक्स आज पुन्हा एकोणसाठ हजारांवर बंद झाला. तर निफ्टी १४६.९५ अंश वाढला.

आज आशियाई व युरोपीय शेअर बाजार तेजीत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्येही खरेदी झाली. त्यामुळे निर्देशांकांची गेल्या आठ दिवसांची पडझडीची मालिका थांबली. आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी झाली. भारतीय आर्थिक परिस्थितीचे आकडे बऱ्यापैकी आल्यामुळे आज सर्वत्र उत्साह होता. त्यामुळे दिवस अखेर सेन्सेक्स ५९,४११.०८ अंशावर तर निफ्टी १७,४५०.९० अंशावर स्थिरावला.

आज एन एस ई वरील १,५९३ शेअरचे भाव तेजीत होते, तर ४५१ शेअरचे भाव तोटा दाखवीत होते. आज सेन्सेक्स एकोणसाठ हजारांच्या खालीही गेला नाही व साठ हजारांच्या वरही गेला नाही. भारतातील जीडीपी चा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला तरी उत्पादनाचा तपशील चांगला आल्यामुळे आज शेअर बाजारांमध्ये उत्साह होता. त्यातच चीनमधील उत्पादनाची आकडेवारीही चांगली आल्यामुळे जागतिक शेअर बाजारही सकारात्मक होते.

आज सेन्सेक्स मधील स्टेट बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, एच सी एल टेक, टीसीएस, मारुती, टाटा मोटर, टाटा स्टील या शेअर्स भाव वाढले. तर एचडीएफसी बँक आणि पॉवरग्रीड या शेअरचे भाव कमी झाले.

भारतीय शेअर बाजारात गेले आठ दिवस भरपूर विक्री झाल्यामुळे आज कमी भावात खरेदी झाली, अशी प्रतिक्रिया जिओजीत फायनान्शिअल सर्विसेस चे विनोद नायर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT