sensex sakal
Share Market

Sensex : सेन्सेक्स ६३ हजारांजवळ; ३४४ अंश वाढला

आज उत्साही गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली व तिसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजार निर्देशांक वाढले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अमेरिकी सरकारच्या कर्ज मर्यादेवर तोडगा निघून तेथील दिवाळखोरीची भीती संपुष्टात आल्यामुळे आज उत्साही गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली व तिसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजार निर्देशांक वाढले. आज सेन्सेक्स ३४४.६९ तर निफ्टी ९९.३० अंश असे प्रत्येकी अर्धा टक्का वाढले.

दिवसअखेर सेन्सेक्स ६२,८४६.३८ अंशावर तर निफ्टी १८,५९८.६५ अंशावर स्थिरावला. आज धातूनिर्मिती कंपन्या, बांधकाम व्यवसाय आणि वित्तसंस्थांच्या शेअर मध्ये खरेदी झाली. तर आयटी आणि ऑइल अँड गॅस यांच्या शेअरमध्ये विक्री झाली. निफ्टी मध्ये टायटन, अल्ट्राटेक, कोल इंडिया, टाटा स्टील, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव वाढले. तर ओएनजीसी, एचसीएल टेक, डिव्हिज लॅब, मारुती, पॉवर ग्रीड या शेअर चे भाव कमी झाले.

बँका आणि अन्य बड्या शेअर च्या खरेदीमुळे आज भारतीय शेअर बाजार तेजीत होते. मोठ्या कंपन्यांनी दिलेले चांगले निकाल, परदेशी वित्तसंस्थांची खरेदी आणि जागतिक सकारात्मक वातावरण यामुळे आता भारतीय शेअर बाजार नव्या सर्वकालिक उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे.

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.

रुपया चार पैसे घसरला

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज रुपया चार पैसे घसरून ८२.६४ वर स्थिरावला. आज जगातील अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होता. मात्र वाढलेला भारतीय शेअर बाजार, भारतात परदेशी निधीची आवक आणि कच्च्या तेलाचे कमी झालेले भाव यामुळे रुपया फार पडला नाही. अमेरिकेत कर्जमर्यादा वाढून दिवाळखोरीची भीती गेल्यामुळे गुंतवणूकदार आनंदीत होते त्यामुळे डॉलर मजबूत झाला. आज रुपयाचे व्यवहार ८२.५७ वर सुरू झाल्यावर त्याने आज ८२.५१ चा उच्चांक तर ८२.६७ चा नीचांक दाखवला. शुक्रवारी रुपया ८२.६० वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT