Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: आज शेअर बाजार बहरला; सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उच्चांकावर, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: 1 एप्रिल रोजी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. सेन्सेक्स 363 अंकांनी वाढून 74,014 वर बंद झाला. निफ्टी 135 अंकांनी वाढून 22,462 वर पोहोचला. इंट्राडे दरम्यान, सेन्सेक्सने 74,254 ची पातळी गाठली आणि निफ्टीने प्रथमच 22,529 ची पातळी गाठली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 April 2024: 1 एप्रिल रोजी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. सेन्सेक्स 363 अंकांनी वाढून 74,014 वर बंद झाला. निफ्टी 135 अंकांनी वाढून 22,462 वर पोहोचला.

इंट्राडे दरम्यान, सेन्सेक्सने 74,254 ची पातळी गाठली आणि निफ्टीने प्रथमच 22,529 ची पातळी गाठली, जो नवीन सार्वकालिक उच्चांक देखील आहे.

बाजारात चौफेर खरेदी झाली, त्यात मेटल आणि मिडिया क्षेत्र आघाडीवर होते. त्याच वेळी, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्राने निराशा केली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 836 अंकांच्या किंवा 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 48912 अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 498 अंकांच्या उसळीसह 15,788 अंकांवर बंद झाला.

याशिवाय बँकिंग आयटी, फार्मा, मेटल, मीडिया, एनर्जी, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. ऑटो, एफएमसीजी शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये JSW स्टील, टाटा स्टील, डिव्हिस लॅब, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो या शेअर्सचा समावेश यात आहे.

शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांच्या यादीत आयशर मोटर्स, टायटन, नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, एलटीआय माइंड ट्री, भारती एअरटेल आणि हिरो मोटोकॉर्प यांचे शेअर्स आहेत.

तसेच टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो आणि ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

गुंतवणूकदारांनी कमावले 6.38 लाख कोटी

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 एप्रिल रोजी वाढून 393.35 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच गुरुवारी 28 मार्च रोजी 386.97 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 6.38 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6.38 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT