Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: RBIच्या निर्णयानंतर सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: आज आरबीआय एमपीसीच्या निर्णयामुळे बँकिंग शेअर्समध्ये उत्साह दिसून आला, ज्यामुळे कमकुवत जागतिक संकेत असूनही बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 20 अंकांनी वाढून 74,248 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 5 April 2024: आज आरबीआय एमपीसीच्या निर्णयामुळे बँकिंग शेअर्समध्ये उत्साह दिसून आला, ज्यामुळे कमकुवत जागतिक संकेत असूनही बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 20 अंकांनी वाढून 74,248 वर बंद झाला. निफ्टी 22,513 च्या जवळ पोहोचला. बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात झाली, तर ऑटो आणि आयटी क्षेत्रात विक्री झाली.

Share Market Closing

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी निर्देशांकामध्ये निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांकात किंचित घसरण झाली तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकांत वाढ झाली आहे.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढले तर 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ झाली तर 30 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर शेअर बाजाराच्या व्यवहारात चढ-उतार दिसून आला.

Share Market Closing

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाईफ, आयटीसी आणि श्रीराम फायनान्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स होते.

तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, भारती एअरटेल, हिंदाल्को आणि बजाज फायनान्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीचा निकाल

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज चलनविषयक धोरण समितीचा अहवाल सादर केला असून त्यात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यानंतर शेअर बाजारात मोठी रिकव्हरी झाली आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

गुंतवणूकदारांनी 81,000 कोटी कमावले

शेअर बाजारात बँकिंग मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या खरेदीमुळे बीएसईवर कंपन्यांचे बाजार भांडवल 399.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 358.60 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आज मार्केट कॅपमध्ये 81,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. किंवा दुसऱ्या शब्दात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 81,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT