Share Market Opening Skala
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 450 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 470 अंकांनी वाढून 71,800 च्या वर गेला. निफ्टीनेही 150 अंकांची उसळी घेतली असून तो 21,660 च्या वर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 9 January 2024:

मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 470 अंकांनी वाढून 71,800 च्या वर गेला. निफ्टीनेही 150 अंकांची उसळी घेतली असून तो 21,660 च्या वर व्यवहार करत आहे.

बाजारात ऑटो, आयटी, पीएसयू बँक आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे. बजाज ऑटोचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्स घसरले आहेत तर उर्वरित 26 शेअर्समध्ये वाढ होत आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनर्समध्ये आयटी शेअर्सचे वर्चस्व आहे. विप्रोच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 48 शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे आणि फक्त 2 शेअर्स घसरत आहेत. बायबॅकच्या बातमीनंतर, बजाज ऑटोचा शेअर 2.81 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो निफ्टीचा टॉप गेनर आहे. येथेही विप्रो टॉप गेनर्समध्ये आहे आणि तो 1.80 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ झाली तर निफ्टी मिडकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरले.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर झी एंटरटेनमेंट, ऑल कार्गो लॉजिस्टिक्स, कॅप्री ग्लोबल आणि टीव्हीएस मोटरच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्व्होटेक पॉवर, जेनसोल इंजिनिअरिंग, बंधन बँक, गरबारी टेक्निकल फायबर्स, आशानिषा इंडस्ट्रीज आणि कामधेनू लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

अदानी समूहाच्या 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक 1.55 टक्के वाढ झाली तर अदानी टोटल गॅस 0.30 टक्क्यांनी वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT