Sensex, Nifty 50 end with healthy gains; investors earn over rs 4 lakh crore in a day  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार पुन्हा जोमात! गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा नफा

Share Market Closing: गुरुवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स 358 अंकांनी वाढून 70,865 वर पोहोचला, जो इंट्राडेमध्ये 69,920 वर घसरला होता.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 21 December 2023:

गुरुवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 358 अंकांनी वाढून 70,865 वर पोहोचला, जो इंट्राडेमध्ये 69,920 वर घसरला होता. निफ्टीही 130 अंकांच्या वाढीसह 21280 वर बंद झाला. व्यापार सत्रात निर्देशांक 20976 पर्यंत घसरला.

बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात झाली. बाजारात उत्साह परतल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 354.51 लाख कोटी रुपये झाले, जे 20 डिसेंबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर 350.19 लाख कोटी रुपये होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बाजारातील स्टार परफॉर्मर मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात मोठी वाढ झाली. निफ्टी मिड कॅप निर्देशांक 742 अंकांच्या उसळीसह 44,767 अंकांवर बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक 280 अंकांच्या उसळीसह बंद झाला.

आजच्या व्यवहारात बँकिंग, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, मेटल, ऑटो, आयटी यासह सर्व क्षेत्रांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 35 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

BSE सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.29% वाढ झाली. यानंतर, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी


उर्वरित 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्सचे शेअर्स 1.37 टक्क्यांनी घसरले. तर HCL Tech, Axis Bank, Mahindra & Mahindra आणि मारुती सुझुकीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT