Sensex, Nifty close in red post-Interim Budget 2024  Sakal
Share Market

Share Market Closing: मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नाराजी; सेन्सेक्स-निफ्टी घसरले

Share Market Closing: आज बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह बंद झाले. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्पात कॅपेक्स बूस्ट, इलेक्ट्रिक व्हेईकल पुश, रेल्वेवर फोकस, लखपती दीदी योजना आणि सौर महत्त्वाकांक्षा या पाच गोष्टींवर भर दिला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 February 2024: आज बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह बंद झाले. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्पात कॅपेक्स बूस्ट, इलेक्ट्रिक व्हेईकल, रेल्वे, लखपती दीदी योजना आणि सौर उर्जा या पाच गोष्टींवर भर दिला. शेअर बाजाराला निर्मला सीतारामन यांचे अंतरिम बजेट 2024 आवडले नाही.

सकाळी सकारात्मक सुरुवात होऊनही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 107 अंकांनी घसरून 71,645 वर आला. निफ्टीही 28 अंकांनी घसरून 21,697 वर बंद झाला. बाजारात सर्वात मोठी घसरण मीडिया, फार्मा, रिअल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्रात झाली. सरकारी बँकिंग, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रात खरेदी झाली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स वाढीसह बंद

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

गुरुवारच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात घसरण झाली, तर निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला.

शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, सिप्ला आणि एसबीआय लाइफचे शेअर्स होते, तर नुकसान झालेल्या शेअर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि डॉ. रेड्डीजचे शेअर्स होते.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याच वेळी, NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 31 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजार कसा होता?

रतन टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. डिसेंबर तिमाहीत टायटनचा निव्वळ नफा 9 टक्क्यांनी वाढून 1040 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला. टायटनचे निकाल शेअर बाजारातील तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत आहेत.

बाजाराला पाठिंबा का मिळाला नाही?

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात भांडवली खर्चात 11 टक्के वाढीची घोषणा केली पण त्याचा बाजाराला फायदा झाला नाही. यूएस फेडने असे संकेत दिले आहेत की, मार्चमध्ये दर कमी होण्याची शक्यता नाही. याशिवाय बँका, एफएमसीजी आणि ऑटो वगळता इतर क्षेत्रातील शेअर्सचा बाजाराला विशेष पाठिंबा मिळाला नाही.

गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटी रुपयांचे नुकसान

बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे भांडवल कमी झाले आहे. 31 जानेवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 379.78 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी ते 379.43 लाख कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 35 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT