Sensex, Nifty open flat; Eicher Motors worst hit  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 72,100च्या जवळ, निफ्टीही घसरला

Share Market Opening: मिश्र जागतिक संकेतांमुळे मंगळवारी शेअर बाजार थोड्या घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 120 अंकांनी घसरून 72150 वर आला. निफ्टी देखील 21700 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 2 January 2024: मिश्र जागतिक संकेतांमुळे मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 120 अंकांनी घसरून 72150 वर आला. निफ्टी देखील 21700 च्या जवळ व्यवहार करत आहे.

बाजारात सर्वाधिक विक्री आयटी आणि बँकिंग क्षेत्रात होत आहे. आयशर मोटर आणि अल्ट्राटेक सिमेंट निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले आहेत. तर टाटा कंझ्युमरचा शेअर सर्वाधिक वाढला आहे.

शेअर बाजारात चढउतार होऊ शकतात, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ झाली तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरले.

शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्समध्ये जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स वधारत होते तर हजूर मल्टी प्रोजेक्ट्स आणि वॉक हार्ट लिमिटेडचे ​​शेअर्सही तेजीत होते.

ब्रँड कॉन्सेप्ट, टाटा मोटर्स, युनिपार्ट्स लिमिटेड, जिओ फायनान्शिअल, स्टोव्ह क्राफ्ट, एक्साइड इंडस्ट्रीज आणि कामधेनू यांचे शेअर्स किरकोळ वाढले तर देवयानी इंटरनॅशनल, पटेल इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओम इन्फ्रा घसरणीसह व्यवहार करत होते.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांचे मत

व्याजदरात कपात, जागतिक चलनवाढ आणि रोखे उत्पन्न कमी झाल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. परंतु लाल समुद्रातील हौथी दहशतवाद्यांच्या कारवाया जागतिक पुरवठा साखळ्यांबद्दल चिंता वाढवत असल्याने वरच्या स्तरावर नफा-वसुली दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT