Sensex sheds 536 pts, Nifty50 cracks below 21,550 Hindalco, JSW Steel drop 4 percent Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 535 अंकांनी खाली

Share Market Closing: बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 535 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 3 January 2024:

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 535 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला.

बाजारातील चौफेर विक्रीत आयटी आणि मेटल क्षेत्र आघाडीवर होते. निफ्टीमध्ये हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलचे सर्वाधिक नुकसान झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टीचा आयटी निर्देशांक 888 अंकांनी घसरला आणि 34,395 अंकांवर बंद झाला. मेटल शेअर्समध्येही घसरण दिसून आली. याशिवाय ऑटो, कमोडिटी, बँकिंग शेअर्सही घसरणीसह बंद झाले. तर फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह आणि 32 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बुधवारी बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस आणि एलटीआय माइंड ट्री यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

आज अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर, अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्स 11 टक्के, अदानी टोटल गॅस 10 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर 5 टक्के, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही 4 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 2 टक्के, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट एक टक्क्याने वाढले.

गुंतवणूकदारांचे 11 हजार कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी बीएसईवरील मार्केट कॅपमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, बाजाराचे मार्केट कॅप 365.10 लाख कोटी रुपयांवर आले आहे जे गेल्या सत्रात 365.21 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 11 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT