Share Market Updates Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Share Market Today: आज मंगळवारी जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 163 अंकांनी घसरून 73,842 वर उघडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 May 2024: आज मंगळवारी जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 163 अंकांनी घसरून 73,842 वर उघडला. निफ्टी 68 अंकांनी घसरून 22,404 वर तर बँक निफ्टी 158 अंकांनी घसरून 47,927 वर उघडला. डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी मजबूत होऊन 83.30 रुपयांवर उघडला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात किंचित वाढ झाली तर उर्वरित निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसी, हिंदाल्को, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स तेजीत होते तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, ब्रिटानिया, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, डिव्हीज लॅब आणि महिंद्राचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स तेजीत तर 19 शेअर्स घसरले आहेत. JSW स्टील 2.28 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर आहे. पॉवर ग्रिड 1.44 टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील 1.40 टक्के आणि एशियन पेंट्स 1.18 टक्क्यांनी वधारले आहेत.

एनटीपीसी 0.90 टक्क्यांच्या मजबूतीने व्यवहार करत आहे. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्यांपैकी नेस्ले 1.87 टक्के आणि M&M 1.10 टक्क्यांनी खाली आहे. इन्फोसिसमध्ये 0.91 टक्के आणि ॲक्सिस बँकेत 0.90 टक्के घसरला आहे. TCS 0.84 टक्क्यांनी घसरला आहे.

Share Market Today

बीएसईचे बाजार भांडवल 412.09 लाख कोटी रुपये झाले आहे. आज 3275 शेअर्सची खरेदी-विक्री सुरू आहे. यापैकी 1413 शेअर्सचे भाव वधारत असून 1682 शेअर्समध्ये घसरण होत आहे. कोणत्याही बदलाशिवाय 180 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. 143 शेअर्सवर अप्पर सर्किट तर 81 शेअर्स लोअर सर्किटवर आहेत.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टीने 22,300 च्या पातळीवर सपोर्ट दिसत असून येथून निफ्टी बाउन्स बॅक करु शकतो. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमाई करायची असेल तर बाजारात घसरण झाल्यावर शेअर्सची खरेदी करू शकता असा सल्ला तज्ज्ञ देतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निफ्टीमधील बुल निवडणूकपूर्व रॅलीचे नेतृत्व करू शकतात. यानंतर निफ्टी 22,795 च्या सर्वकालीन उच्चांक आणि 23,000 चे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT