Stock Market Sakal
Share Market

Stock Market: शेअर बाजारात रोज नवा विक्रम; सेन्सेक्स 1,00,000चा जादुई आकडा कधी गाठणार?

Stock Market: शेअर बाजार रोज नवे विक्रम करत आहे. सेन्सेक्सने 85 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्स 80 ते 85 हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड महिना लागला. अशा स्थितीत सेन्सेक्स एक लाखाचा जादुई आकडा कधी गाठणार हे पाहणे बाकी आहे.

राहुल शेळके

Stock Market: शेअर बाजार रोज नवे विक्रम करत आहे. सेन्सेक्सने 85 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्स 80 ते 85 हजारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड महिना लागला. अशा स्थितीत सेन्सेक्स एक लाखाचा जादुई आकडा कधी गाठणार हे पाहणे बाकी आहे.

तज्ज्ञांच्या मते, सेन्सेक्स ज्या वेगाने वाढत आहे, तो दिवस जास्त लांब दिसत नाही. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, गेल्या 45 वर्षांत सेन्सेक्स 850 पटीने वाढला आहे.

सेन्सेक्सची सुरुवात 1979 साली झाली. तेव्हापासून त्याने 850 पट परतावा दिला आहे. त्यावेळी जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 8.5 कोटी इतकी झाली असती. आता सेन्सेक्सने 85 हजारांचा आकडा ओलांडल्याने तो एक लाखावर कधी पोहोचणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

1,00,000च्या जादुई पातळीला स्पर्श करण्यासाठी सेन्सेक्सला आता आणखी 17.5 टक्क्यांनी झेप घ्यावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा गाठण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. दलाल स्ट्रीटवरील काही विश्लेषकांच्या मते, आर्थिक वर्ष 2025 मध्येच सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा गाठेल. तज्ञांच्या मते, जर सेन्सेक्स 16 टक्क्यांच्या ऐतिहासिक सरासरी CAGR वर वाढत राहिला, तर डिसेंबर 2025 च्या आसपास तो एक लाखाचा टप्पा गाठू शकतो.

Dezerv चे सह-संस्थापक वैभव पोरवाल यांच्या मते, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बाजाराने 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला पाहिजे. या परताव्यानुसार सेन्सेक्स वाढत राहिला तर एक लाख अंकांपर्यंत पोहोचण्यासाठी 18 ते 24 महिने लागतील. ते म्हणाले की, बाजारातील सध्याची तेजी लक्षात घेता सेन्सेक्स लवकरच एक लाखाचा टप्पा गाठेल.

परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत

परकीय गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ खूप आकर्षित करत आहे. एमके ग्लोबलचे शेषाद्री सेन यांच्या म्हणण्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात चुका झाल्या आहेत.

परंतु त्यांचा विश्वास आहे की ते आता भारतात त्यांची गुंतवणूक वाढवण्यास तयार आहेत. या वर्षात आतापर्यंत सुमारे 92 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. तर 2023 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 1.7 लाख कोटी रुपये गुंतवणूक केली होती. अशा स्थितीत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT