Multibagger Stock Update
Multibagger Stock Update Sakal
Share Market

Multibagger Stock Update: 'या' स्मॉलकॅप मल्टीबॅगरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता स्टॉक स्प्लिटची केली घोषणा

शिल्पा गुजर

Multibagger Stock Update: सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेड (Servotech Power Systems Ltd) शेअरने नुकतीच स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिटसाठी 28 जुलै 2023 निश्चित केली आहे.

1:2 प्रमाणात हा स्टॉक स्प्लिट केला जाईल. हा स्मॉलकॅप स्टॉक 5 रुपयांवरून सध्या 165.75 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 3,200% वाढ झाली आहे.

सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक 29 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत बंद राहील असे स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड डेटबद्दल कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले.

कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपये आहे, जे प्रत्येकी 1 रुपयाच्या 2 शेअर्समध्ये विभागले जाईल. तसेच, या प्रक्रियेतील रेकॉर्ड डेटसाठी 28 जुलै 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

या मल्टीबॅगर स्टॉकची घोडदौड आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये दमदार चालू आहे. या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 32 रुपयांवरून 165.75 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच तो 450% वाढला आहे.

हा स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात 12.65 रुपयांवरुन 165.75 पर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 3200% वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ''मला माझ्या प्रयत्नांवर विश्वास आहे, पण...'' प्रचार थांबल्यानंतर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

महाविद्यालये २० जूनला उघडणार; विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक घोषित; दिवाळीची सुट्टी २१ ऑक्टोबरला

Viral Photo: इतका राग कशाचा! भाजी मार्केटमधील महिलेचा फोटो होतोय व्हायरल; काय आहे स्टोरी?

Latest Marathi News Live Update : शहरातील सर्वाधिक गाड्यांच्या संख्येमुळे पुण्यातील प्रदूषण वाढले

Satish Joshi: ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT