share market and psychology nifty bank nifty sensex bse nse sebi
share market and psychology nifty bank nifty sensex bse nse sebi eSakal
Share Market

शेअर बाजार आणि मानसिकता

सकाळ वृत्तसेवा

- स्वाती क्षीरसागर

सध्या शेअर बाजार हा सर्वोच्च स्थानावर जाऊन स्थिरावला आहे. ‘निफ्टी’ने २१,३०० अंशांची पातळी आणि बँक ‘निफ्टी’ने ४० हजारांची पातळी ओलांडली असून, ‘सेन्सेक्स’ ७१ हजारांच्या वर स्थिरावला आहे.

याचाच अर्थ, भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत होत आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल सुरू असताना, शेअर बाजारही त्याला चांगली साथ देताना दिसत आहे. या परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. तरीही आजही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांची मानसिकता.

आपण बँकेत मुदत ठेव ठेवताना किंवा सोने खरेदी करताना अतिशय आनंदी भावनेने करतो. ही गुंतवणूक करताना आपण साशंक नसतो. सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपण ती अगदी निश्‍चिंतपणे करतो.

मात्र, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो, तेव्हा मात्र आपण अतिशय चिंताग्रस्त आणि डळमळीत मनाने करतो. ही मानसिकता बदलली, तर शेअर बाजारातून मिळणाऱ्या भरभक्कम परताव्याचा लाभ आपण घेऊ शकतो.

मी बरेच दिवस महिलांसाठी आणि गृहिणींसाठी शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबतचे मोफत वर्ग घेत असे; पण असे दिसून आले, की याचा उपयोग करून प्रत्यक्ष बाजारात उतरून गुंतवणूक करण्यासाठी फारच कमी लोक उत्सुक आहेत.

अनेकदा पैसा वाढविण्याच्या खोट्या भूलथापांना, जाहिरातींना बळी पडून लोक पैसा गमावतात. मात्र, आपलाच पैसा, ज्ञान, बुद्धी वापरून शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा का नाही मिळविता येणार? सध्याची महागाई, निवृत्तीवेतनाची सोय नसणे, वाढते वैद्यकीय खर्च, राहणीमान या सर्व बाबींचा विचार केला, तर अधिकाधिक पैसा कमविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शेअर बाजार हे नक्कीच एक चांगले साधन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT