Share Market Closing latest updates in marathi Sensex closes 100 pts higher; Nifty near 21k; PSU banks lead; small, midcaps shine 11 december 2023  Sakal
Share Market

Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीचा नवीन उच्चांक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 1.88 लाख कोटी

Share Market Closing: चांगल्या जागतिक संकेतांमुळे सोमवारी शेअर बाजारात खरेदी दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 11 December 2023:

चांगल्या जागतिक संकेतांमुळे सोमवारी शेअर बाजारात खरेदी दिसून आली. प्रमुख निर्देशांकांनी इंट्राडेमध्ये नवीन विक्रमी उच्चांक केला. सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक 70,057 तर निफ्टीने 21,026 चा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.

शेवटी, निफ्टी 27 अंकांनी वाढून 20,997 वर आणि सेन्सेक्स 102 अंकांनी वाढून 69,928 वर बंद झाला. सरकारी बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये बाजारात सर्वाधिक खरेदी नोंदवण्यात आली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात एफएमसीजी ऑटो, आयटी, धातू, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर तेल आणि वायू, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये पुन्हा जोरदार खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह आणि 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

एफएमसीजी निर्देशांकात आज 0.6 टक्क्यांची वाढ झाली आणि इन्फ्रामध्ये 0.58 टक्क्यांची वाढ झाली. आयटी आणि ऑटो निर्देशांक 0.50 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 100 0.74 टक्के वधारला, तर बँकिंग शेअर्स आज किरकोळ (0.11 टक्के) वाढले, तर फार्मा शेअर्स आज विक्रीच्या दबावाखाली दिसले.

NSE वर यूपीएल जवळपास 3 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर होता, अल्ट्रा टेक सिमेंटच्या शेअर्समध्ये आज 2.50 टक्क्यांची वाढ झाली. ओएनजीसीचे शेअर्स 1.70 टक्क्यांनी वाढले, तर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 1.20 टक्क्यांनी वधारले.

आज फार्मा क्षेत्रावर दबाव होता. डॉक्टर रेडिसच्या शेअर्समध्ये आज सर्वात मोठी घसरण झाली आणि ते 5 टक्क्यांनी घसरले. सिप्ला शेअर्स 1.46 टक्क्यांनी घसरले. अॅक्सिस बँक आणि बीपीसीएलचे शेअर्सही एक टक्का घसरले.

गुंतवणूकदारांनी 1.88 लाख कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 11 डिसेंबर रोजी 351.11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 8 डिसेंबर रोजी 349.23 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.88 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.88 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT