Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Apollo Hospitals, Adani Ports gain; Dr Reddy’s, SBI Life drag 3 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: दिवाळीपूर्वी बाजार चमकला; सेन्सेक्स 282 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 3 November 2023:

शुक्रवारी (3 नोव्हेंबर) सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 282 अंकांनी वाढून 64,363 वर बंद झाला. निफ्टीनेही 92 अंकांची उसळी घेत 19,225 वर पोहोचला. बँकिंग, ऑटो, रिअल्टी क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. याशिवाय बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

निफ्टी मिड कॅप निर्देशांक 275 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 155 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढले आणि 14 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.22 टक्के वाढ झाली. तर JSW स्टील, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि ICICI बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

सेन्सेक्समधील उर्वरित 14 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक 2.37 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.93 लाख कोटींची वाढ

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 3 नोव्हेंबर रोजी वाढून 315.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी 313.24 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.93 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.93 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT