Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Axis Bank, L&T top gainers on Sensex 6 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात तेजीची ‘हॅट-ट्रिक’, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.5 लाख कोटींची वाढ

Share Market Closing: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.69 लाख कोटींची वाढ झाली

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 November 2023:

शेअर बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 594 अंकांनी वाढून 64,958 वर पोहोचला. निफ्टी 181 अंकांनी वाढून 19,400 वर पोहोचला. मेटल आणि फार्मा क्षेत्र बाजार खरेदीत आघाडीवर राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बँक निफ्टी 301 अंकांच्या उसळीसह 43,619 अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्राचे निर्देशांक वाढीसह बंद झाले.

तर आजच्या व्यवहारात केवळ PSU बँकांच्या शेअर्समधील निर्देशांक आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्स निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील खरेदीमुळे निर्देशांक पुन्हा वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 4 घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 44 शेअर्स वाढीसह आणि 6 घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.16 टक्के वाढ झाली आहे. तर अॅक्सिस बँक, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सचे फक्त 4 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स सर्वाधिक 0.72% घसरले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), टाटा मोटर्स आणि टायटनचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.69 लाख कोटींची वाढ झाली

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 3 नोव्हेंबर रोजी वाढून 318.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी, 2 नोव्हेंबर रोजी 315.22 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.69 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.69 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT