Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Bank, Finance drag; Pharma shines 18 October 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: इस्राइल आणि हमासमधील तणावामुळे बाजाराचा मूड खराब, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला

Share Market Closing: शेअर बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग क्षेत्रात झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 October 2023: इस्राइल आणि हमास यांच्यातील वाढत्या युद्धाच्या चिंतेमुळे बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. BSE सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला आणि 65,877 वर बंद झाला.

निफ्टीही 140 अंकांनी घसरून 19,671 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात झाली. निफ्टीमध्ये बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स सर्वाधिक घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर झाला आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टी 520 अंकांच्या घसरणीसह 43,888 अंकांवर बंद झाला.

याशिवाय आयटी, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर हेल्थकेअर, फार्मा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्स वाढीसह तर 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 40 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 4 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.92 टक्के वाढ झाली आहे. तर सन फार्मा, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समधील उर्वरित 26 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी बजाज फायनान्सचे शेअर्स 2.85 टक्क्यांनी घसरले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांचे 2.39 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 18 ऑक्टोबर रोजी 321.43 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी 323.82 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता

U19 Asia Cup, IND vs PAK: समीर मिन्हासचं द्विशतक हुकलं, भारतानं पाकिस्तानला साडेतीनशेच्या आत रोखलं; विजयासाठी 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Loha election result : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का! लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपचे एकाच कुटुंबातील सहा जण पराभूत!

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

Latest Marathi News Live Update: २६ नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

SCROLL FOR NEXT