Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Infosys, TCS and HCL Tech16 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 65,982 वर बंद, आयटी शेअर्समध्ये वाढ

Share Market Closing: सेन्सेक्स 306 अंकांनी वाढून 65,982 वर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 16 November 2023:

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत बंद झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीत होते. BSE सेन्सेक्स 306 अंकांनी वाढून 65,982 वर पोहोचला. निफ्टीने 90 अंकांची उसळी घेत 19,765 वर पोहोचला. आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. टेक महिंद्रा आणि हिरो मोटोकॉर्प हे निफ्टीमध्ये 3-3% टक्क्यांनी वाढले. तर कोल इंडिया आणि अॅक्सिस बँक 1-1 टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

जर आपण सेन्सेक्समधील कंपन्यांवर नजर टाकली तर आज त्यापैकी बहुतेक कंपन्या नफ्यात होत्या. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स नफ्यात होते, तर 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. आयटी शेअर्समध्ये आज सर्वाधिक वाढ झाली.

टीसीएसचा शेअर सर्वात जास्त 3 टक्क्यांनी वाढला. एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर्स 2.32 ते 2.82 टक्क्यांनी वाढले तर बजाज फायनान्स सुमारे 2 टक्क्यांनी वधारला.

एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टाटा मोटर्स या शेअर्सनीही चांगला नफा मिळवला. दुसरीकडे, अॅक्सिस बँकेला सर्वाधिक दीड टक्क्यांचा फटका बसला. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचेही एक टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सचे केवळ 8 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये देखील अॅक्सिस बँक 1.43% घसरणीसह बंद झाला. तर पॉवर ग्रिड, ITC, ICICI बँक आणि JSW स्टीलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 1.66 लाख कोटी कमावले

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 16 नोव्हेंबर रोजी 327.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी 325.40 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.66 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT