Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today mid, smallcaps gain 17 October 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: 3 दिवसांनी बाजारात चमक; सेन्सेक्स 261 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी किती नफा कमावला?

Share Market Closing: सलग 3 दिवसांच्या विक्रीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 17 October 2023: मंगळवारी शेअर बाजारात खरेदीची नोंद झाली. सलग 3 दिवसांच्या विक्रीनंतर प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 261 अंकांनी वाढून 66,428 वर बंद झाला. निफ्टीही 79 अंकांच्या उसळीसह 19,811 वर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे आजच्या व्यवहारात वाढ झाली. याशिवाय एफएमसीजी, एनर्जी, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस मेटल, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स तेजीने बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि उर्वरित 8 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. 50 निफ्टी शेअर्सपैकी 38 शेअर्स वाढीसह आणि 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.07 टक्के वाढ झाली आहे. तर कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि आयटीसीचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समधील उर्वरित 8 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक 1.49 टक्क्यांनी घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.56 लाख कोटींची वाढ

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 17 ऑक्टोबर रोजी वाढून 323.81 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी 322.25 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.56 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.56 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT