Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today midcap smallcaps underperform 30 October 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर्समधील खरेदीमुळे बाजार तेजीसह बंद; गुंतवणूकदारांना 5.5 लाख कोटींचा नफा

Share Market Closing: सेन्सेक्सने 200 अंकांची उसळी घेत 64000 चा टप्पा पार केला आहे

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 30 October 2023:

सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. प्रमुख निर्देशांक खालच्या स्तरावरून सावरले आणि तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्सने 200 अंकांची उसळी घेत 64000 चा टप्पा पार केला. निफ्टीही 19100 च्या जवळ पोहोचला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅसच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणत्या शेअर्समध्ये तेजी

शेअर बाजारात आज बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी आणि आरआयएलच्या शेअर्समध्ये वाढ झाली. यूपीएल, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि अॅक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होती. निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक मध्ये किंचित वाढ झाली.

गौतम अदानी समूहाच्या नऊ पैकी 7 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर अदानी विल्मार लिमिटेड आणि नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून बंद झाले, तर अदानी एंटरप्रायझेस 1.47 टक्क्यांनी, अंबुजा सिमेंट 1.33 टक्क्यांनी आणि अदानी पॉवर 1.17 टक्क्यांनी वधारले.

गुंतवणूकदारांना मोठा नफा

एक्सचेंज डेटानुसार, गुंतवणूकदारांनी 2 दिवसात सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कारण BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 311.69 लाख कोटी रुपये झाले आहे, जे 26 ऑक्टोबर रोजी 306.04 लाख कोटी रुपये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

Panchang 8 July 2025: आजच्या दिवशी गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2025

kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

SCROLL FOR NEXT