Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Pharma, metals gain, IT, FMCG stocks fall 24 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: आठवडाभर बाजार सुस्त; सेन्सेक्स 65,970 वर बंद, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Closing: सेन्सेक्स 47 अंकांनी घसरून 65,970 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 24 November 2023:

शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली. BSE सेन्सेक्स 47 अंकांनी घसरून 65,970 वर बंद झाला. निफ्टीही 7 अंकांनी घसरून 19,794 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी, एफएमसीजी आणि सरकारी बँकिंग क्षेत्रात झाली. तर मेटल आणि फार्मा क्षेत्रात खरेदी झाली. या काळात मिडकॅप निर्देशांक सलग 17 व्या दिवशी तेजीत राहिला.

सेन्सेक्सवर सर्वात जास्त नुकसान आयटी कंपन्यांच्या शेअर्सना झाले आहे. एचसीएल टेकला सर्वाधिक 1.55 टक्के नुकसान सहन करावे लागले. टीसीएस आणि विप्रोलाही प्रत्येकी दीड टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले. टेक महिंद्रा आणि इन्फोसिसला प्रत्येकी 1% नुकसान सहन करावे लागले. नेस्ले इंडिया आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ही नुकसान झाले.

बँकिंग शेअर्सला झाला फायदा

अनेक दिवसांपासून विक्रीचा सामना करणाऱ्या बँकिंग शेअर्सने आज बाजाराला दिलासा दिला आहे. अॅक्सिस बँकेचा शेअर सर्वाधिक सुमारे 1 टक्के वाढला होता. HDFC बँक 0.68 टक्के आणि ICICI बँक 0.66 टक्क्यांनी वधारला. एनटीपीसी आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्सही तेजीत होते.

गुंतवणूकदारांनी 27,000 कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 24 नोव्हेंबर रोजी वाढून 328.60 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी 328.33 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 27,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 27,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, फार्मा आणि मेटल निर्देशांकात वाढ नोंदवली गेली तर निफ्टी आयटीमध्ये घसरण नोंदवली गेली. निर्देशांकांमध्ये निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक मध्ये किंचित वाढ नोंदवली गेली.

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सिप्ला, डिव्हीज लॅब, अदानी एंटरप्रायझेस आणि हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर अपोलो हॉस्पिटल, विप्रो, एचसीएल टेक आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT