Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today TaMo, HCL Tech shine; Axis, Infy gain13 October 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स 125 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्सचे झाले नुकसान?

Share Market Closing: जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 13 October 2023: शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरले. BSE सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 66,000 च्या खाली गेला. निफ्टीही 110 अंकांनी घसरून 19,700 च्या पातळीवर होता.

मार्केट सेल ऑफमध्ये आयटी आणि बँकिंग शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. निफ्टीमध्ये इन्फोसिस 2.5% च्या घसरणीसह टॉप लूसर आहे, तर HCL टेक 2.5% च्या वाढीसह टॉप गेनर आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे निफ्टी बँक 0.86 टक्के किंवा 383 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. आयटी शेअर्स, पीएसयू बँका, मेटल, मीडिया, तेल आणि गॅस क्षेत्र घसरणीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही नफा बुकिंग दिसून आला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 13 October 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.76 टक्के वाढ झाली आहे. तर इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया आणि मारुती सुझुकीचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समधील उर्वरित 14 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी अॅक्सिस बँकेचे शेअर्स 2.33 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), विप्रो आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांचे 28 हजार कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 13 ऑक्टोबर रोजी वाढून 321.79 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवार, 12 ऑक्टोबर रोजी 322.07 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 28 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 28 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT