Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात दमदार तेजी, सेन्सेक्स 273 अंकांनी वधारला; काय आहे तेजीचे कारण?

शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली.

राहुल शेळके

Share Market Closing 11 July 2023: शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारात जोरदार खरेदी झाली. BSE सेन्सेक्स 273 अंकांनी वाढून 65,617 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 83 अंकांनी वाढून 19,439 वर बंद झाला आहे.

बाजारातील तेजीत ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्स आघाडीवर होते. निफ्टीमध्ये आयशर मोटर आणि सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक वाढले होते, तर यूपीएलचे शेअर्स टॉप लूसर होते.

याआधी सोमवारी (10 जुलै) भारतीय बाजार काहीशा वाढीसह बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 63 अंकांनी वाढून 65,344 वर बंद झाला.

आज बाजारातील तेजीची कारणे:

  • जागतिक बाजारातून चांगले संकेत

  • डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

  • FIIs-DII ची खरेदी

  • हेवीवेट स्टॉक्समध्ये वाढ

'या' शेअर्समध्ये तेजी

सन फार्माचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.71 टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्याचप्रमाणे मारुती, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, टायटन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टीलचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

रुपया मजबूत स्थितीत:

आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी मजबूत होऊन 82.36 वर बंद झाला. मागील सत्रात रुपया 82.57 च्या पातळीवर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांनी 2 लाख कोटी रुपये कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 10 जुलै रोजी रु. 301.39 लाख कोटी झाले आहे, जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 10 जुलै रोजी रु. 299.41 लाख कोटी होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT