Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारातील 2 दिवसांच्या तेजीला ब्रेक; गुंतवणूकदारांचे 46,000 कोटी रुपयांचे नुकसान

Share Market Closing: एफएमसीजी क्षेत्राला बाजारातील वेगवान विक्रीचा फटका बसला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 17 August 2023: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 388 अंकांनी घसरून 65,151 वर बंद झाला. निफ्टीही 100 अंकांची घसरणीसह 19,365 वर बंद झाला आहे.

एफएमसीजी क्षेत्रात मोठी घसरण

एफएमसीजी क्षेत्राला बाजारातील वेगवान विक्रीचा फटका बसला. ITC शेअर 2% घसरून बंद झाला. तर टायटनचा शेअर सर्वाधिक वाढला. याआधी बुधवारी भारतीय बाजारात किंचित वाढ नोंदवण्यात आली होती.

बाजारातील घसरणीची कारणे

  • FED मध्ये व्याजदर वाढीचे संकेत

  • अमेरिका, युरोपसह आशियाई बाजारात विक्री

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

  • हेवीवेट शेअर्समध्ये मोठी घसरण

S&P BSE SENSEX

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात एफएमसीजी, बँकिंग, आयटी, एनर्जी, फार्मा, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले. वाहन क्षेत्रातही घसरण झाली आहे. केवळ ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आली.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची गती कायम आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 8 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 22 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढले तर 33 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट

आजच्या व्यवहारात बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 303.90 लाख कोटी रुपयांवर आले, जे मागील सत्रात 304.36 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 46,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

BSE सेन्सेक्सवर ITC चा शेअर सर्वाधिक 2.04 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टीसीएस आणि एचयूएलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

टायटनचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.12 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि सन फार्मा यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT