Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद, बँकिंग शेअर्सचे काय?

बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक केला आहे.

राहुल शेळके

Share Market Closing 17 July 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी नोंदवली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक केला आहे. BSE सेन्सेक्स 66,400 आणि NSE निफ्टी 19,661 वर प्रथमच पोहोचला.

NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, IT आणि PSU बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे. याशिवाय फार्मा शेअर्स तेजीत आहे. विप्रो निफ्टीमध्ये 3% वाढीसह अव्वल स्थानावर आहे, तर Hero Moto आणि ONGC सर्वाधिक घसरले आहेत.

बाजारातील तेजीचे कारण

  • जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत

  • डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला

  • परदेशी गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक

  • हेवीवेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Share Market Closing 17 July 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

एसबीआयचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.96 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, मारुती, एशियन पेंट्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

टायटनचा शेअर सेन्सेक्सवर सर्वाधिक 1.09 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि एनटीपीसी यांचे शेअर्स शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी वेग पकडला आहे. बँक निफ्टी 1.41 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी आयटी 0.31 टक्के, फार्मा 0.77 टक्के, धातू, मीडिया, ऊर्जा, आरोग्यसेवा, तेल आणि वायू, ग्राहक टिकाऊ वस्तू यांसारखी क्षेत्रे तेजीसह बंद झाली.

तर ऑटो आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स घसरले. स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह तर 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅप मध्ये वाढ

शेअर बाजारातील नेत्रदीपक तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप प्रथमच 303 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. आज व्यवसायाच्या शेवटी, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 303.88 लाख कोटी रुपये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT