Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स 202 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्सनी केले नुकसान?

Share Market Closing: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 81 हजार कोटी रुपयांची घट झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 August 2023:

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 0.31% किंवा 202 अंकांनी घसरून 64,949 वर बंद झाला. 8 शेअर्समध्ये खरेदी आणि 22 मध्ये विक्री झाली. निफ्टीमध्ये टेक महिंद्रा आणि टीसीएसचे शेअर्स 2-2 टक्क्यांनी घसरून बंद झाले. तर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 3-3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

बाजारातील घसरणीची कारणे

  • जागतिक बाजारातून कमकुवत संकेत

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

  • हेवीवेट शेअर्समध्ये मोठी घसरण

Share Market Closing Latest Update 18 August 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर सर्वाधिक 2.14 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे टेक महिंद्रा, इन्फोसिस, पॉवरग्रीड, सन फार्मा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, टायटन, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि एनटीपीसी यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), मारुती, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल), टाटा मोटर्स, आयटीसी आणि एसबीआय यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी सांगितले की, आयटी शेअर्स तसेच पीएसयू शेअर्समध्ये नफावसुली झाल्यामुळे आज देशांतर्गत इक्विटी बाजार घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे 81 हजार कोटी बुडाले

BSE वर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवार, 18 ऑगस्ट रोजी 303.16 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवसाच्या म्हणजेच गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी 303.97 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 81 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 81 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT