Share Market Update esakal
Share Market

Share Market Closing: तीन दिवसानंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सनीही चांगली कामगिरी केली.

राहुल शेळके

Share Market Closing 26 July 2023: बुधवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगले राहिले. बँकिंग आणि एमएमसीजी शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात चमक दिसून आली.

या तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीजचाही वाटा आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 351 अंकांच्या तेजीसह 66,707 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांच्या वाढीसह 19,778 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या ट्रेडिंग सत्रावर नजर टाकली तर ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्स वगळता सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी, मीडिया, एफएमसीजी, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सनीही चांगली कामगिरी केली. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढले तर 11 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्स वाढीसह आणि शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सवरील लार्सन अँड टुब्रोचा शेअर आज सर्वाधिक 3.30 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे आयटीसीचे शेअर्स 2.11 टक्‍क्‍यांनी, सन फार्माचे शेअर्स 1.70 टक्‍क्‍यांनी, रिलायन्स इंडस्‍ट्रीजचे शेअर्स 1.65 टक्‍क्‍यांनी, कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 1.12 टक्‍क्‍यांनी, अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स 1.10 टक्‍क्‍यांनी आणि इन्फोसिसचे शेअर्स 1.07 टक्‍क्‍यांनी वाढले.

Share Market Closing 26 July 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बजाज फायनान्सला सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.29 टक्‍क्‍यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि आयटीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

रुपया 13 पैशांनी घसरला

आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 82 वर बंद झाला. मागील सत्रात तो 81.87 च्या पातळीवर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ

शेअर बाजारातील नेत्रदीपक तेजीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 303.92 लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील ट्रेडिंग सत्रात 301.95 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.97 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

SCROLL FOR NEXT