Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात घसरण, सेन्सेक्स 106 अंकांनी खाली, मिड कॅप शेअर्सचे काय झाले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing 28 July 2023: ऑगस्ट सीरिजच्या पहिल्या आणि शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार पुन्हा प्रॉफिट बुकींगमुळे घसरणीसह बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे.

मात्र, मिड कॅप आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 107 अंकांनी घसरून 66,160 अंकांवर तर निफ्टी 14 अंकांनी घसरून 19,646 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी क्षेत्रातील शेअर्स वधारून बंद झाले. फार्मा, मेटल्स, एनर्जी, एफएमसीजी, मीडिया, रिअल इस्टेट, कन्ज्युर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स वधारले तर 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

शेअर बाजारात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 304.07 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. जे गुरुवारच्या सत्रात 303.59 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 48,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Closing 28 July 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सवर एनटीपीसीच्या शेअरने सर्वाधिक 4.11 टक्क्यांची उसळी घेतली. त्याचप्रमाणे पॉवर ग्रीडचा शेअर 3.09 टक्क्यांनी वाढून बंद झाला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, आयटीसी, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एचयूएल यांचे शेअर्स वधारून बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, टीसीएस, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, मारुती, इन्फोसिस, मारुती, टायटन आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

रुपया 31 पैशांनी घसरला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी घसरून 82.25 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT