share market  sakal
Share Market

Share Market Closing: व्यवहाराच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार किंचित वाढीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing 10th April 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार काहीशा वाढीसह बंद झाला. बँकिंग शेअर्स घसरल्याने बाजारावर दबाव होता. मात्र आयटी, ऊर्जा, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून खरेदी दिसून आली.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 13.54 अंकांच्या वाढीसह 59,846 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25 अंकांच्या वाढीसह 17,624 अंकांवर बंद झाला. (Share Market closing latest updates today 10 April 2023 bse nse sensex nifty)

आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. पण एफएमसीजी, बँकिंग क्षेत्राचे शेअर्स घसरले.

BSE India

आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील शेअर्सही तेजीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये तेजी:

आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सचे शेअर्स 5.37 टक्के, विप्रो 1.99 टक्के, पॉवर ग्रिड कॉर्प 1.78 टक्के, लार्सन 1.46 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.42 टक्के, टेक महिंद्रा 1.41 टक्के वाढून बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण:

बजाज फायनान्स 1.78 टक्क्यांनी, इंडसइंड बँक 1.37 टक्क्यांनी, एचयूएल 1.35 टक्क्यांनी, एशियन पँट्स 1.13 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 10 एप्रिल रोजी 263.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 6 एप्रिल रोजी 262.37 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 71 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 70 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT