Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स 128 अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये...

आज शेअर बाजारात प्रचंड चढउतार झाले.

राहुल शेळके

Share Market Closing 18 May 2023: आज शेअर बाजारात प्रचंड चढउतार झाले. बीएसई सेन्सेक्स 128 अंकांनी घसरून 61,431 वर बंद झाला, तर निर्देशांकाने इंट्राडेमध्ये 61,955 चा आकडा गाठला. निफ्टी 52 अंकांनी घसरून 18,129 वर बंद झाला. याआधी सकाळी बाजारात तेजीसह सुरुवात झाली होती.

NSE वर निफ्टी FMCG, फार्मा आणि PSU बँक निर्देशांक 1 पेक्षा जास्त घसरले. म्हणजेच या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.

याआधी बुधवारी बीएसई सेन्सेक्स 371 अंकांनी घसरून 61,560 वर आणि निफ्टी 104 अंकांनी घसरून 18,181 वर बंद झाला.

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले. फक्त बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स शेअर्सही घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्समधील 13 शेअर्सनी तेजी नोंदवली तर 37 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सच्या कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स 1.22 टक्‍क्‍यांनी, कोटक महिंद्रा 1.03 टक्‍क्‍यांनी, भारती एअरटेल 0.94 टक्‍क्‍यांनी, ICICI बँक 0.94 टक्‍क्‍यांनी, HDFC बँक 0.41 टक्‍क्‍यांनी आणि HDFC 0.37 टक्‍क्‍यांनी घसरले. एसबीआय 2.11 टक्‍क्‍यांनी, आयटीसी 1.87 टक्‍क्‍यांनी, टायटन कंपनी 1.62 टक्‍क्‍यांनी घसरले.

गुंतवणूकदारांची संपत्तीत घट:

आजच्या ट्रेडिंग सत्रात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती कमी झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 275.85 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

जे बुधवारी 277.26 लाख कोटी रुपये होते. जे मंगळवारी म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 1.41 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT