share market  sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद; आज 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सकाळच्या घसरणीनंतर बाजारात खरेदी झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing 26th April 2023: भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचे ट्रेडिंग सत्र चांगले राहिले आहे. सकाळच्या घसरणीनंतर बाजारात खरेदी झाल्यामुळे बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला.

BSE सेन्सेक्स 198 अंकांच्या तेजीसह 60,329 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49 अंकांच्या तेजीसह 17,818 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात बँकिंग ऑटो, आयटी, एफएमसीजी, इन्फ्रा या क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. तर धातू, ऊर्जा, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

BSE India

बाजारातील तेजीची कारणे:

  • सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरला

  • रिअल इस्टेट, कॅपिटल गुड्स, ऑटो, पीएसयू बँकांचे शेअर्स वधारले

  • धातू, तेल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली

  • लाभांश आणि बायबॅकच्या नवीन नियमांमुळे GSFC, GMDC, GSFC, गुजरात अल्कलीजमध्ये मोठे वाढ

  • सीटीओच्या राजीनाम्यामुळे एमसीएक्समध्ये मोठी घसरण

'या' शेअर्समध्ये तेजी:

पॉवरग्रिडचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक 2.49 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स एक टक्का वाढले.

तसेच SBI, TCS, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), एशियन पेंट्स, HDFC बँक, ICICI बँक, टायटन, मारुती, इन्फोसिस आणि ITC कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण:

बजाज फिनसर्व्हचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 0.84 टक्के घसरला. याशिवाय NTPC, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 0.55 टक्क्यांनी घसरून बंद झाले.

गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली:

शेअर बाजारातील तेजीमुळे बुधवारच्या व्यवहारात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

बीएसईवर सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल वाढून 267.71 लाख कोटी रुपये झाले आहे, जे मंगळवारी 267 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 71,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT