Share Market latest updates today
Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराने आर्थिक वर्षाला नेत्रदीपक तेजीसह दिला निरोप, 'या' शेअर्सने केले मालामाल

राहुल शेळके

Share Market Closing 31th March 2023: भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच शुक्रवारी जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 59000 आणि निफ्टी 17400 च्या जवळ व्यवहार करत होता. आयटी आणि बँकिंगचे शेअर्स विशेषत: खाजगी क्षेत्रातील बँकांचे शेअर्स बाजाराच्या खरेदीमध्ये पुढे आहेत.

बाजारातील तेजीचे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील खरेदीचा परतावा. याशिवाय डॉलर निर्देशांकात घसरण आणि रुपया मजबूत होत आहे.

शेअर बाजारातील तेजीचे कारण :

  • चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारात वाढ

  • सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेजी

  • ऊर्जा, आयटी, बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक तेजी

  • मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी

  • संरक्षण आणि शिपयार्ड ऑर्डरमुळे या शेअर्समध्ये वाढ झाली आहे

रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्स हे शेअर्स निफ्टीमध्ये वाढले. अपोलो हॉस्पिटल्स, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, एशियन पेंट्स आणि बजाज फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक घसरले.

आयटी निर्देशांक आज 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे ऑटो, बँक, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, रियल्टी आणि ऑइल अँड गॅस 1 टक्क्यांनी वाढून बंद झाले.

गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3.42 लाख कोटींची कमाई :

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 254.71 लाख कोटी रुपयांवरून वाढून रु. 258.13 लाख कोटी झाले आहे. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.42 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.96% आणि 1.35% च्या वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात सर्वात मोठी उडी आयटी, टेक, बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एनर्जी, ऑइल अँड गॅस, रियल्टी आणि टेलिकम्युनिकेशन शेअर्समध्ये दिसून आली. बाजारातील या चौफेर तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 3.42 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT