Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची वाढ, 'या' शेअर्सचे...

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.

राहुल शेळके

Share Market Closing 8 May 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 709 अंकांनी वाढून 61,763.31 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 202 अंकांच्या वाढीसह 18,271 वर बंद झाला. बँकिंग, ऑटो, फायनान्शिअल आणि रियल्टी शेअर्स तेजीत होते.

इंडसइंड बँक शेअर निफ्टीमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजीत होता. तर कोल इंडिया आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1-1 टक्क्यांची घसरण दिसून आली. याआधी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार विक्री दिसून आली.

Share Market Closing 8 May 2023

बँक शेअर्सची जबरदस्त तेजी:

आज बँक शेअर्सच्या जबरदस्त तेजीमुळे शेअर बाजारात वाढ झाली आणि सेन्सेक्समध्ये 700 अंकांची वाढ हा त्याचाच परिणाम आहे.

आज बँक निफ्टी 622 अंकांच्या म्हणजेच 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 43,284 च्या पातळीवर बंद झाला आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही 327 अंकांनी वाढून 1.02 टक्क्यांवर बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स तेजीत:

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये वाढी झाली आणि केवळ 3 शेअर्समध्ये घसरणीसह व्यापार बंद झाला. इंडसइंड बँकेचा सर्वाधिक शेअर 4.92 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. टाटा मोटर्स 4.82 टक्के, बजाज फायनान्स 4.21 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 3.32 टक्के वाढीसह बंद झाले.

निफ्टीच्या रिअल्टी सेक्टरमध्ये ऑटो शेअर्स 1.8 टक्क्यांनी वधारले. वित्तीय शेअर्स 1.50 टक्क्यांनी आणि बँक निफ्टी 1.47 टक्क्यांनी वधारले. तेल आणि वायूचे शेअर्स 0.68 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT