Share Market update Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम; सेन्सेक्स 800 अंकांच्या वर, काय आहे तेजीचे कारण?

शुक्रवारी (30जून) शेअर बाजारात नवीन विक्रम होत आहे. BSE सेन्सेक्सने 600 अंकांच्या उसळीसह 64,500 चा स्तर पार केला.

राहुल शेळके

Share Market Closing 30 June 2023: शुक्रवारी (30जून) शेअर बाजारात नवीन विक्रम होत आहे. BSE सेन्सेक्सने 600 अंकांच्या उसळीसह 64,500 चा स्तर पार केला. इंट्राडेमध्ये निर्देशांक 64,519 वर पोहोचला, जो नवीन उच्चांक आहे.

त्याचप्रमाणे निफ्टीनेही 160 अंकांची उसळी घेत 19,100 चा टप्पा पार केला. निफ्टीने इंट्राडेमध्ये 19,138 चा उच्चांक गाठला.

आयटी-ऑटो स्टॉक्समध्ये जोरदार तेजी

बाजारामध्ये ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार तेजी आहे. खरेदीमध्ये आयटी, फार्मा, ऑटोसह रियल्टी निर्देशांकात जोरदार वाढीसह बंद झाले.

IndusInd Bank, M&M, Sun Pharma यांचे शेअर्स निफ्टीमध्ये 3-3% ने वाढले आहेत. तर अदानी पोर्ट्स आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स सुमारे दीड टक्क्यांनी घसरले आहेत.

(Nifty, Sensex clock record closing highs amid strong buying across sectors)

बाजारातील तेजीचे कारण

  • जागतिक बाजारातून चांगले संकेत

  • हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी

  • डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला

  • चांगले तिमाही निकाल आणि कंपन्यांच्या कमाईत वाढ

  • बकरी ईदमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार बंद राहिला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 500 अंकांच्या उसळीसह 63,915 वर बंद झाला.

Share Market Closing 30 June 2023

आजच्या व्यवसायात बँकिंग, ऑटो, आयटी, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

विशेषतः, निफ्टी आयटीमध्ये 710 अंकांची किंवा 2.46 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. तर बँक निफ्टीने 396 अंकांची किंवा 0.89 टक्क्यांची उसळी घेतली. आजच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप निर्देशांक 227 अंकांच्या किंवा 0.64 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

तर स्मॉल कॅप शेअर्समध्येही वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह बंद झाले तर केवळ 3 शेअर्स घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह तर 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, BSE चे मार्केट कॅप 296.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

जी आतापर्यंतची ऐतिहासिक विक्रमी पातळी आहे. तर शेवटच्या सत्रात BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 294.30 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT