Share Market Closing latest updates in marathi Esakal
Share Market

Share Market Closing: महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद; सेन्सेक्समध्ये 194 अंकांची उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: गुरुवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बाजार फ्लॅट सुरू झाल्यानंतर जोरदार खरेदी झाली. प्रमुख निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 195 अंकांनी वाढून 72,500 वर पोहोचला. निफ्टीही 31 अंकांच्या वाढीसह 21,982 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 29 February 2024: गुरुवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बाजार फ्लॅट सुरू झाल्यानंतर जोरदार खरेदी झाली. प्रमुख निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 195 अंकांनी वाढून 72,500 वर पोहोचला. निफ्टीही 31 अंकांच्या वाढीसह 21,982 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये झाली, तर आयटी आणि हेल्थकेअरमध्ये विक्री झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वाढ झाली.

Share Market Closing

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारात तेजी असलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, टाटा कंझ्युमर, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, ब्रिटानिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिड यांचा समावेश होता, तर घसरण शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री, Divi's Lab आणि HUL च्या शेअर्सचा समावेश होता.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तेजीच्या काळात अदानी समूहाच्या 10 पैकी सात कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर तीन कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर अंबुजा सिमेंटचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी वाढले.

पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले

सॉफ्टबँकने पेटीएममधील 2.17 टक्के हिस्सा कमी केला आहे. गुरुवारी दाखल झालेल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये हिस्सा कमी केल्याची माहिती देण्यात आली आहे. या बातमीनंतर पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले. सध्या पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे शेअर्स 4.38 टक्क्यांनी घसरून 388.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

गुंतवणूकदारांनी 2.94 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 29 फेब्रुवारी रोजी 388.91 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी 385.97 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.94 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT