शेअर बाजाराचा ‘जीव’ ट्रक इंडस्ट्री! sakal
Share Market

Share Market : शेअर बाजाराचा ‘जीव’ ट्रक इंडस्ट्री!

शेअर बाजाराचा ‘जीव’ ट्रक इंडस्ट्री आहे, असे म्हटले आहे, कारण शेअर बाजारात नोंदलेल्या कंपन्यांच्या ६० ते ७० टक्के मालाची वाहतूक ट्रकने होते

गोपाळ गलगली

शेअर बाजाराचा ‘जीव’ ट्रक इंडस्ट्री आहे, असे म्हटले आहे, कारण शेअर बाजारात नोंदलेल्या कंपन्यांच्या ६० ते ७० टक्के मालाची वाहतूक ट्रकने होत असते. एखाद्या देशाची भरभराट ही त्या देशाच्या रस्त्यांवर पळणाऱ्या ट्रकच्या प्रमाणावरून जाणून घेता येते.

ट्रकचे उत्पादन करणाऱ्या काही कंपन्याचा आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या वस्तूंमध्येदेखील शेअर बाजारातील कंपन्याच दिसत असतात.

उदा. चहाच्या टेबलावर चहाची कंपनी (टाटा टी, हिंदुस्थान लिव्हर), बिस्किटे (ब्रिटानिया) यांकडेच त्यांचे लक्ष जाते. रस्त्यावरील दुचाकींमध्ये बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा अशा कंपन्याच दिसतात.

ट्रक उद्योगाची ताकद

देशभरात विविध प्रकारच्या मालाची वाहतूक रेल्वे, ट्रक आणि विमानाद्वारे होत असते. रेल्वेने वाहतूक होत असली, तरी ट्रकची मदत लागतेच. देशात २०२२ मध्ये जवळपास तीन लाख २७ हजार अवजड वजनाच्या ट्रकचे उत्पादन झाले होते. देशातील ट्रकची बाजारपेठ २०२२ मध्ये २००४ कोटी डॉलरची होती. पुढील सहा वर्षांत, २०२८ पर्यंत ते ३६३५ कोटी डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

देशातील उद्योगक्षेत्राच्या सुधारणेमध्ये ट्रक उद्योग मोठा हातभार लावत आहे. प्रत्येक मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकची गरज असते. त्यामुळे ट्रक व्यवसायाला पर्याय नाही. पर्यायाने, चांगल्या ट्रक उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

ट्रक उत्पादक कंपन्या

  • टाटा मोटर्स

  • अशोक लेलॅंड

  • आयशर

  • महिंद्र अँड महिंद्र

  • एसेमेल इसूझू

  • डॅमलर बेंझ

  • हिरो मोटर्स

  • भारत बेंझ

  • स्कॅनिया

मालवाहतूक कंपन्या

  • व्हीआरएल लॉजिस्टिक्स

  • टीसीआय

  • कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

  • सिकल लॉजिस्टिक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT