Share Market During Lok Sabha Election 2014 and 2019 how election and stock markets are connected  Sakal
Share Market

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत शेअर बाजारात गोंधळ; 2014 आणि 2019मध्ये कशी होती मार्केटची स्थिती?

Share Market Action During Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यांचा जवळचा संबंध आहे. निवडणुका जाहीर होताच बाजारात चढ-उतार होत असतात. यंदाही असेच काहीसे घडत आहे. बाजारात चढ-उतारांचा टप्पा सुरूच असतो.

राहुल शेळके

Share Market Action During Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यांचा जवळचा संबंध आहे. निवडणुका जाहीर होताच बाजारात चढ-उतार होतात. यंदाही असेच काहीसे घडत आहे. बाजारात चढ-उतारांचा टप्पा सुरूच आहे. विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणूकदार बाजाराला साथ देत आहेत. मात्र, बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही निवडणुकांमधील बाजारातील हालचालींवरून भविष्यात बाजाराचा मूड कसा असेल हे समजते.

2014 मध्ये, 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान लोकसभेच्या निवडणुका नऊ टप्प्यात पार पडल्या आणि 16 मे रोजी त्याचे निकाल जाहीर झाले. निवडणूक सुरू होण्यापूर्वी बाजारात चढ-उतार दिसून आले. 10 फेब्रुवारीला निफ्टी 6,041 अंकांवर होता, जो 7 एप्रिलपर्यंत 6,776 अंकांवर पोहोचला. या काळात सेन्सेक्स 20,414 अंकांवरून 22,628 अंकांवर पोहोचला.

28 एप्रिल ते 19 मे या कालावधीत पुन्हा एकदा बाजारात मोठी वाढ दिसून आली. निफ्टी 7,367 अंकांवर पोहोचला. या काळात सेन्सेक्स 24,693 अंकांवर पोहोचला.

2019 मध्ये बाजार कसा होता?

लोकसभा निवडणूक 2019 सात टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी तर सातव्या टप्प्याचे मतदान 19 मे रोजी पार पडले. त्याचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. निवडणूक सुरू होण्यापूर्वी बाजारात मोठी वाढ दिसून आली. निफ्टी 18 फेब्रुवारी रोजी 10,738 अंकांवरून 15 एप्रिल रोजी 11,752 अंकांवर पोहोचला. याच कालावधीत सेन्सेक्स 35,820 अंकांवरून 39,140 अंकांवर पोहोचला.

मतदानाच्या काळात 15 एप्रिल ते 6 मे या पुढील तीन आठवडे बाजारात घसरण होती. या काळात निफ्टी 11,278 अंकांवर तर सेन्सेक्स 37,462 अंकांवर घसरला. पण पुढील तीन आठवड्यांत म्हणजेच 27 मे पर्यंत बाजाराने पुन्हा वेग पकडला, त्यामुळे निफ्टी 11,922 अंकांवर आणि सेन्सेक्स 39,714 अंकांवर आला.

यंदा बाजाराची स्थिती कशी आहे?

यंदाही निवडणुकीपूर्वी बाजारात सुरुवातीची वाढ दिसून आली. निफ्टी 20 मार्च रोजी 21,839 अंकांच्या पातळीवर होता, जो 10 एप्रिल रोजी 22,753 अंकांवर पोहोचला. या काळात सेन्सेक्स 72,101 अंकांवरुन 75,038 अंकांवर पोहोचला.

यानंतर बाजार घसरला आणि 18 एप्रिलपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 21,995 अंकांवर आणि 72,488 अंकांवर घसरले. तेव्हापासून निफ्टी 22,750 ते 22,800 अंकांच्या दरम्यान आणि सेन्सेक्स 72,000 ते 75,100 अंकांच्या दरम्यान व्यवहार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT