Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातून नफा कमावण्यासाठी 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

काल 1,892 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1,496 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी शेअर बाजार एका रेंजमध्ये फिरल्यानंतर हिरव्या रंगात बंद झाला. सेन्सेक्स 273 अंकांच्या वाढीसह 65617.84 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 83.50 अंकांनी वाढून 19439.40 वर बंद झाला. मंगळवारच्या व्यवहारात मार्केट ब्रेड्थही पॉझिटीव्ही राहिली. सुमारे 1892 शेअर्समध्ये वाढ झाली तर 1496 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बँक निफ्टीवर सध्या बिअर्सचे वर्चस्व असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. वरच्या पातळीवरून विक्रीचा दबाव आहे. बँक निफ्टीला 45200 पातळीच्या जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे, ज्यावर मात करणे कठीण आहे.

सध्या बँक निफ्टी 44800-44750 या महत्त्वाच्या सपोर्ट झोनजवळ आहे. हा सपोर्ट गेल्यास, निफ्टी बँक 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजकडे (20DMA) सरकते जी 44500-44000 च्या रेंजमध्ये आहे. बँक निफ्टी इंडेक्स 44500-45500 च्या विस्तृत श्रेणीत व्यवहार करत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • मारुती (MARUTI)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

Nashik: ३६ वर्षीय विवाहितेनं २६ वर्षीय प्रियकराचा केला खून, जिच्यासाठी घर सोडलं तिनेच संपवलं; तिघींवर गुन्हा दाखल

Nagpur: नवीन नागपूर, तिसऱ्या रिंगरोड प्रकल्पाला 'डबल बूस्ट', जमीन व्यवहार शुल्क माफ; एनएमआरडीएची ६०० कोटींची होणार बचत

Satara Accident: विहिरीतील खोल पाण्याने घेतला चिमुकल्याचा बळी; आई बचावली, मुलाचा मृत्यू, दहिवडीत हृदयद्रावक घटना

'तीन ब्राऊनी आणि पिझ्झा हे...' सारा अली खानने कसं घटवलं 45 किलो वजन, म्हणाली...

SCROLL FOR NEXT